Why pay central taxes when Modi govt doesnt release funds asks Chandrababu Naidu Sakal
देश

कौशल्य विकास गैरव्यवहारप्रकरणी चंद्राबाबूंची गुन्हा रद्दची याचिका फेटाळली

‘१७ अ’बाबत न्यायाधीशांत मतभिन्नता; सरन्यायाधीशांकडे प्रकरण सुपूर्त

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कौशल्य विकास गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावेळी दोन न्यायाधीशांच्या पीठाने १७ (अ) बाबतीत वेगवेगळे मत मांडल्याने हे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे सोपविले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ (अ) च्या व्याख्येबाबत न्यायाधीशांची मते भिन्न आढळून आले. या कलमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

कौशल्य विकास गैरव्यवहारप्रकरणी दाखल असलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका चंद्राबाबू नायडू यांनी दाखल केली. मात्र ही याचिका दोन न्यायाधीशंच्या पीठाने फेटाळली. यादरम्यान १७ (अ) बाबतचा निकाल न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या पीठाने राखून ठेवला.

यावर दोघांनी वेगवेगळा निकाल दिला. हे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे पाठवून दिले. न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या पीठाचे कलम १७ अ नुसार निकाल देण्याबाबत एकमत झाले नाही.

न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांच्या मते, नायडू यांच्याविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी परवानगी घ्यायला हवी होती. त्याचवेळी न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या मते, या प्रकरणात प्रिव्हेंशन ऑफ करप्शन १७ अ लागू होत नाही. त्यामुळे गुन्हा रद्दची याचिका स्वीकारण्यास नकार दिला.

प्रकरण काय?

२०१६ मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेश स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली होती.

३३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तत्कालीन राज्य सरकारने सिमन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड व डिझाईन टेक सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला होता. या नुसार सिमन्सने राज्यात सहा कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. मात्र चंद्राबाबू नायडू यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आंध्राच्या तिजोरीला ३७१ कोटींचा फटका बसल्याचे आरोपात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT