Chandrakant Patil Meet Raj Thakceray 
देश

भाजप-मनसे युतीसाठी दिल्ली दौरा? चंद्रकांत पाटील म्हणाले...

शरयू काकडे

दिल्ली : शिवसेनेसोबत युती तोडल्यापासून भाजपा आणि मनसे जवळ येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, नाशिकच्या विश्रामगृहात मिळालेल्या भेटीचे निमंत्रण प्रत्यक्षात आणत काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंजवर काल भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा-मनसे आघाडी करु शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, भाजप- मनसेयुती बाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करणार का असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,''मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि दिल्ली दौऱ्याचा काही संबंध नाही. १५ दिवस आधी हा दौरा ठरला होता. राज ठाकरे यांचं भेटी बाबतच मी त्यांना ब्रिफींग करणार आहे. अजून बातचीत प्रायमरी लेव्हलला आहे.

''नव्या मंत्र्यांना भेटणे हा उद्देश आहे. महाराष्ट्र संबंधी प्रश्न मांडणार आहे. जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी यांच्या भेट घेणार आहे. असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीत चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली, यावेळी राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

SCROLL FOR NEXT