देश

'या' आहेत देशातील सर्वात तरूण खासदार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ओडिशातील एका 25 वर्षीय तरूणीने सर्वात कमी वयाची लोकसभा सदस्य होण्याचा मान पटकाविला. चंद्रानी मुर्मू असे त्यांचे नाव असून त्या अभियांत्रिकीच्या पदवीधारक आहेत. आदिवासी मतदारांचे वर्चस्व असलेल्या केंजर या मतदार संघातून बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. चंद्रानी मुर्मू यांचे वय 25 वर्षे, 11 महिने आणि नऊ दिवस इतके आहे.

चंद्रानी मुर्मू म्हणाल्या की, रोजगार निर्मिती करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असून मतदारसंघात नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. "केंझरसारख्या खनिजांनी समृद्ध असलेल्या जिल्ह्यातदेखील बेरोजगारीचे संकट जास्त असणे, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी मी माझ्या राज्यातल्या तरुणांचे आणि महिलांचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करणार आहे," असेही  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रानी मुर्मू यांनी भाजपच्या अनंत नायक या दोन वेळा खासदार ठरलेल्या उमेदवाराचा 66,203 मतांनी पराभव केला. मर्मू म्हणाल्या की, मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर ती नोकरी शोधत होती, मात्र, 2019 ची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT