Chandrayaan-3 
देश

Chandrayaan-3: माझ्यामुळेच चांद्रयान-३ मोहीम यशस्वी... गुजरातच्या बीकॉम पास 'मुन्नाभाई'चा दावा

Sandip Kapde

Chandrayaan-3: चांद्रयान-३ माहीमेमुळे ISRO चे जगभरात कौतुक होत आहे. भारतावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. भारतीय नागरीक चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. मात्र गुजरातमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. सुरतमधील एका व्यक्तीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

खरं तर, एका व्यक्तीने दावा केला आहे की तो इस्रोचा वैज्ञानिक आहे आणि त्याच्यामुळेच भारताची चंद्र मोहीम यशस्वी झाली. इतकंच नाही तर त्याने चांद्रयानच्या लँडरची रचना केल्याचा दावा केला आहे. प्रथमदर्शनी हे दावे खोटे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गुजरात पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) हेतल पटेल यांनी शुक्रवारी सांगितले की, शहर पोलिस आयुक्त अजय तोमर यांनी प्रथमदर्शनी खोटे असलेले दावे तपासण्यासाठी गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेतल पटेल म्हणाले की, गुरुवारी विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यापासून स्थानिक मीडियाला मुलाखती देत ​​असलेला मितुल त्रिवेदी इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याच्या दावा करत आहे. मात्र त्याच्याकडे कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावे नाहीत.

पीएचडी असल्याचा दावा करणाऱ्या त्रिवेदी यानी गुरुवारी अनेक माध्यमांना आणि वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. यावेळी त्याने सांगितले की, त्यांनी चांद्रयान-३ च्या लँडरची रचना केली आहे.तो चांद्रयान-2 चा भाग असल्याने, इस्रोने त्याला चांद्रयान-3 मोहिमेवर काम करण्यासाठी आमंत्रित केले.लँडरच्या मूळ डिझाइनमध्ये मी अनेक बदल केल्याचा दावा त्यांनी केला.त्यामुळे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. (Latest Marathi News)

काही स्थानिक वृत्तपत्रांनी शुक्रवारी त्रिवेदींच्या दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वृत्त प्रकाशित केले. त्रिवेदी यांना दावे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांसह शुक्रवारी कार्यालयात येण्यास सांगितले होते, असे हेतल यांनी सांगितले.

परंतु तो इस्रोशी संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने कोणतेही कागदपत्र किंवा पुरावे सादर केले नाही. आमच्या तपासणीत तो बी.कॉम.पदवी धारक असल्याचे समोर आले आहे. शास्त्रज्ञ असल्याच्या त्याच्या दाव्यांबद्दल विचारले असता तो म्हणाला की तो फ्रीलांसर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT