Chandrayaan 3 Landing 
देश

Chandrayaan 3 Landed: चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यापूर्वी ISRO चा मोठा जागतिक विक्रम! जाणून घ्या...

Sandip Kapde

Chandrayaan 3 Landing : भारताचे चांद्रयान-३ आज (२३ ऑगस्ट) संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले आहे. प्रत्येक भारतीय या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात होत्या. यापूर्वी ISRO ने मोठा विक्रम केला आहे.

ISRO ने चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्यापूर्वी नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे. Chandrayaan3 थेट प्रक्षेपण 3.4 दशलक्ष दर्शकांचा स्पॅनिश स्ट्रीमर Ibai चा जागतिक विक्रम मोडला.

ISRO च्या अधिकृत YouTube चॅनेल आणि फेसबूकवर 9.1 दशलक्षाहून अधिक लोक Chandrayaan- 3 Landing ऑनलाइन पाहत होते.

भारताने हा पराक्रम केला तेव्हा 80,59,688 हून अधिक लोक ऑनलाइन जोडल्यागेले होते. यात सतत वाढ होत होती. Facebook वर चांद्रयान-3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर 355.6K पेक्षा जास्त लोक जोडल्या गेले होते.

केवळ भारतातच नाही तर जगभरातील असंख्य लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. भारतात, दूरदर्शन टीव्ही हे या महत्त्वाच्या प्रसंगाचे अधिकृत प्रसारक होते. इस्रोच्या अधिकृत प्रसारण चॅनेलवर अनेक लोकांनी चांद्रयान-3 लँडिंग लाईव्ह पाहिले.

दूरदर्शनवरील प्रसारण किती लोकांनी पाहिले याची अधिकृत संख्या अद्याप जाहीर केली गेली नसली तरी, चांद्रयान-3 विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर चॅनेलच्या यूट्यूब लिंकवर 7,50,822 पेक्षा जास्त लोक जोडल्या गेले होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना चांद्रयान-2 क्रॅश झाले होते. अशा परिस्थितीत इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी इस्रोने चांद्रयान-3 मध्ये अनेक बदलही केले होते.

त्याचबरोबर दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT