देश

Chandrayaan-3: चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या मार्गात आला खड्डा अन्...; ISRO ने शेअर केले नवीन फोटो

Sandip Kapde

Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने टिपलेला एक नवा फोटो इस्त्रोने ट्वीट केला आहे. रोव्हरने टिपलेल्या फोटोमध्ये चंद्रावरील खड्ड्यांची दृश्य दिसत आहेत. चांद्रयान-3 मिशनचे रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चालत आहे.

इस्रोने आज सोमवारी (28 ऑगस्ट) रोव्हरची आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. तसेच, इस्रोने सांगितले की, रविवारी (27 ऑगस्ट) रोव्हर एका मोठ्या खड्ड्यात पोहोचले होते. मात्र, ते सुखरूप परतले.

फोटो शेअर करत इस्रोने ट्विट केले की, "27 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 मोहिमेचे रोव्हर प्रज्ञान त्याच्या स्थानाच्या 3 मीटर पुढे 4 मीटर व्यासाच्या क्रेटरवर पोहोचले. रोव्हर एका मोठ्या खड्ड्यात पोहोचले होते. यानंतर रोव्हरला परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. तो आता सुरक्षितपणे नवीन मार्गावर जात आहे. त्याला कमांड देण्यात आली आहे."

चंद्राच्या पृष्ठभागाचा आलेख प्रसिद्ध-

काल इस्रोने चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरला जोडलेल्या चेस्ट पेलोडच्या चंद्राच्या पृष्ठभागावर मोजलेल्या तापमानातील फरकाचा आलेख प्रसिद्ध केला होता.

यानुसार चंद्रावर वेगवेगळ्या खोलीतील तापमानात मोठा फरक आहे. चंद्राचा पृष्ठभाग 50 डिग्री सेल्सिअस इतका गरम असताना, जेव्हा तुम्ही पृष्ठभागाच्या फक्त 80 मिमी खाली जाते तेव्हा तापमान उणे 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येते. चंद्राचा पृष्ठभाग एखाद्या इन्सुलेट भिंतीसारखा आहे, ज्यामध्ये सूर्याच्या तीव्र उष्णतेचा प्रभाव पृष्ठभागाच्या आत येण्यापासून रोखण्याची क्षमता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT