Narendra Modi Sakal
देश

Chandrayaan-3 : 'अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण!' भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

भारत महत्त्वकांक्षी पाऊल टाकण्याकडे झेपावले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : भारताने चांद्रयान - ३ मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचं सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचं सांगितलं.

मोदी म्हणाले...

जेव्हा आपण आपल्या डोळ्यांच्या समोर इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य झाल्याचे दिसते. हा चिरंजीवी क्षण आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण अवघड महासागराला पार करण्याचा आहे. हा जिंकण्याच्या नव्या वाटेचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा आहे.

मोदी म्हणाले, मी ब्रिक्समध्ये आहे. पण आता प्रत्येक भारतीयासारखं माझं मनही चांद्रयान-३ मध्ये गुंतलेलं आहे. मी खूप आनंदी आहे. देशवासियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे. मी इस्त्रो, देशातल्या सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो. १४० जनतेला कोटी कोटी धन्यवाद देतो.

आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम खूपच प्रेरणादायी आहे. जिथं कुणीही गेलं नाही तिथं आपण गेलो. आता यापुढे चंद्राविषयीच्या अनेक गोष्टी बदलून जातील. याचे कारण भारत आहे. चंद्राला मामा म्हणतो, चंदा मामा बहूत दूर के है, असे म्हटले जायचे. आता तो दिवस जवळ आले आहे. चंदा मामा एक टूर के है....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT