Moon Sakal
देश

Chandrayaan-3 : चंद्राच्या मार्गावर ‘ट्रॅफिक जॅम’! भारताच्या ‘चांद्रयान-२’सह सहा यानांचे कक्षेत भ्रमण

भारताचे ‘चांद्रयान-३’ चंद्राभोवतीची कक्षा टप्प्याटप्याने कमी करत आहे. पण केवळ भारताचेच यान चंद्राभोवती परिभ्रमण करीत नसून आणखी सहा चांद्र याने कक्षेत आहेत.

वृत्तसंस्था

बंगळूर - भारताचे ‘चांद्रयान-३’ चंद्राभोवतीची कक्षा टप्प्याटप्याने कमी करत आहे. पण केवळ भारताचेच यान चंद्राभोवती परिभ्रमण करीत नसून आणखी सहा चांद्र याने कक्षेत आहेत. आगामी काळात त्यात आणखी भर पडणार आहे. अवकाशात सध्या यानांची वाहतूक वाढली असून सर्व मोहिमांचा केंद्रबिंदू चंद्र आहे.

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ चे लुनार रिकॉनन्सेस ऑर्बिटर (एलआरओ), तसेच ‘अर्टिमिस’ मोहिमेअंतर्गत पुनर्निर्मित ‘थेमिस’ (टाइम हिस्ट्री ऑफ एव्हेंट्स अँड मॅक्रोस्केल इंटरॲक्शन ड्युरिंग सबस्टॉर्ब्म्स) यान, कॅपस्टोन, भारताचे चांद्रयान-२, कोरियाचे पाथफाईंडर ही याने चंद्राभोवती सध्या फिरत आहेत.

लुनार रिकॉनन्सेस ऑर्बिटर

‘एलआरओ’चे उड्डाण २००९ मध्ये झाले होते. ५०X२०० किलोमीटर उंचीवरून ते चंद्राभोवती फिरत असून चंद्राच्या पृष्ठभागाचे उच्च क्षमतेचे नकाशे हे यान पाठवते. ‘अर्टिमिस पी१ आणि पी२’ ही अंतराळ याने जून २०११ मध्ये चंद्राच्या कक्षेत स्थापन करण्यात आली. अंदाजे १०० किमी x १९,००० किमी उंचीच्या स्थिर विषुववृत्तीय, उच्च-लहरींच्या कक्षामध्ये ती कार्य करीत आहे.

चांद्रयान -२

भारताच्या दुसऱ्या मानवविरहित चांद्र मोहिमेत २०१९ मध्ये ‘चांद्रयान-२’ या यानाचा संपर्क विक्रम लँडरशी तुटला असला तरी ते चंद्रापासून १०० कि.मी उंचावरून भ्रमण करीत आहे.

मार्ग आणखी गजबजणार

चंद्राकडे जाणारा मार्ग पुढील काळात अधिक व्यग्र होणार आहे. रशियाचे ‘लूना-२५’ हे यान शुक्रवारी (ता.११) चंद्राकडे झेपावेल. १६ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची आणि २१ रोजी चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरण्याची अपेक्षा आहे.

रशियाच्या ‘लूना-२५’ या मोहिमेबरोबरच अमेरिका ‘अर्टिमिस’ कार्यक्रमाद्वारे चांद्र मोहिमांचे नियोजन करत आहे. ‘अर्टिमिस-१’ या मानवविरहित चाचणी यानाने २०२२ च्या अखेरीस चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेला आहे. भविष्यातील अर्टिमिस मोहिमांमुळे चंद्राच्या कक्षेतील वाहतुकीत भर पडण्याची शक्यता आहे.

टक्कर टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी

चांद्र मोहिमांच्या वाढत्या संख्येमुळे संशोधन आणि शोधासाठी शास्त्रज्ञांच्या दृष्टिने चंद्र हा केंद्रबिंदू ठरत आहे. चंद्राकडील वाहतूक वाढल्याने यानांची टक्कर होण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी व मोहिमा यशस्वी होण्यासाठी योग्य समन्वय आणि व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT