Chandrayaan 3 Moonquake 
देश

Chandrayaan 3 Moonquake: चांद्रयान-3 च्या विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर शोधल्या भूकंपासारख्या 'नैसर्गिक' हालचाली

Sandip Kapde

Chandrayaan 3 Moonquake:  23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेली चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विविध प्रयोग करत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम वेगवेगळी माहिती गोळा करत आहे. ISRO याची माहिती जगाला देत आहे.

दरम्यान विक्रम लँडरला चंद्रावर "नैसर्गिक" भूकंपासारखी घटना आढळून आली आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज (गुरुवार) सांगितले.

इस्रोला चंद्रावर भूकंपासारख्या नैसर्गिक हालचाली शोधल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चंद्राच्या भूमीवरून येणारी ही माहिती खरोखरच भूकंपाची आहे की आणखी काही याबाबत अद्याप स्पष्टता  झालेली नाही. लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडने एक घटना नोंदवली आहे जी नैसर्गिक घटनेशी किरकोळ साम्य असल्याचे दिसते.  ILSA चे प्राथमिक उद्दिष्ट नैसर्गिक भूकंप, प्रभाव आणि कृत्रिम घटनांमुळे निर्माण होणारे भूकंप मोजणे हे आहे.

25 ऑगस्ट 2023 रोजी रोव्हरच्या नेव्हिगेशन दरम्यान रेकॉर्ड केलेली माहिती इस्रोने आलेखात दर्शविली आहेत. याव्यतिरिक्त, 26 ऑगस्ट रोजी रेकॉर्ड केलेली नैसर्गिक वाटणारी घटना देखील दर्शविली आहे. या घटनेचा स्रोत इस्रो सध्या तपासात आहे. (Chandrayaan update news)

इस्रोने सांगितले की आम्ही सर्व स्त्रोतांचा तपास करत आहोत. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) उपकरणाने ऑक्सिजन तसेच चंद्रावरील इतर काही लहान घटकांचा शोध घेतल्याची माहिती इस्रोने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT