Somnath_Modi 
देश

Video: "सोमनाथाचं नाव चंद्राशी जोडलेलं..."; PM मोदींनी अफ्रिकेतून दिल्या ISRO प्रमुखांना खास शुभेच्छा

पंतप्रधान मोदी सध्या ब्रिक्स समिटसाठी दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान ३ नं मोहिमेनं खणखणीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण अफ्रिकेतून थेट इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन लावला आणि त्यांच्यासह टीमचं अभिनंदन केलं.

सोमनाथाचं नाव चंद्राशी जोडलेलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. मोदींचा फोनवर बोलतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Chandrayaan 3 Somnath name associated with Moon PM Modi greets ISRO chief from South Africa)

फोनवरुन शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, सोमनाथजी तुमचं तर नाव सोमनाथ आहे. सोमनाथ नाव चंद्राशी जोडलेलं आहे. त्यामुळं तुमचे कुटुंबिय देखील खूपच आनंदी असतील. माझ्यावतीनं तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. तसेच सर्वांना माझ्यावतीनं अभिनंदन सांगा. शक्य होईल तेवढ्या लवकर मी तुम्हा सर्वांचं प्रत्यक्ष पण अभिनंदन करेन. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. (Latest Marathi News)

दरम्यान, बंगळुरुच्या इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून भारताचे सर्व वैज्ञानिक चांद्रयानाच्या चंद्रावर उतरण्याचा सोहळा पाहत होते. अखेर विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पाऊल ठेवल्यानंतर इस्त्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. (Marathi Tajya Batmya)

यावेळी दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं ब्रिक्स समिटसाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एस. सोमनाथ यांनी फोन केला आणि चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्याची माहिती दिली. "भारत चंद्रावर पोहोचला" या तीन शब्दांतच त्यांनी पंतप्रधान मोदींना मोहिम फत्ते झाल्याची पहिली खबर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT