Chandrayaan 3 Successful Landing PM Narendra Modi Praised  esakal
देश

Chandrayaan 3 Viral Memes : 'सुनो गौर से दुनियावालो, आम्ही आता चंद्रावर आलो!' भारताची चांद्रयान मोहीम जगात भारी

गेल्या काही वर्षांपासून भारताच्या चांद्रयान ३ विषयी वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु होती.

युगंधर ताजणे

Chandrayaan 3 Successful Landing PM Narendra Modi Praised : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. भारताच्या या कामगिरीनं जगात वेगळा ठसा उमटवला आहे. चांद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होताच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. त्यांच्या कामगिरीला धन्यवाद दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारताच्या चांद्रयान ३ विषयी वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी रशियाच्या चांद्रयानाला आलेल्या अपयशामुळे भारताच्या चांद्रयानाविषयी अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते. अखेर भारताच्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश आल्याचे दिसून आले. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन इस्त्रोच्या टीमनं चंद्राला गवसणी घातली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सध्या सोशल मीडियावर कौतुकाचे मीम्स व्हायरल झाले आहे.त्यामध्ये अनेकांनी जगातील विविध देश आणि भारत यांच्यात तुलना करुन चांद्रयानाच्या तिसऱ्या मोहीमेचे कौतुक केले आहे. आता भारत जगातला पहिला देश ठरला आहे. ज्यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत त्यांना धन्यवाद दिले आहे.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, या मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचं सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचं सांगितलं.

आताचा क्षण हा अवघड महासागराला पार करण्यासारखा आहे. हा जिंकण्याच्या नव्या वाटेचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. नव्या भारताचा आहे.अशा शब्दात मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT