Chandrayaan 3 Update Moon Orbit eSakal
देश

Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-३'चा आणखी एक टप्पा पूर्ण; चंद्राच्या कक्षेत केला यशस्वीपणे प्रवेश!

ISRO Moon Mission : ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी 'चांद्रयान-३'ने अवकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आता २२ दिवसांनी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.

चांद्रयान-३ मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. चांद्रयानाला चंद्राच्या कक्षेत अलगदपणे पोहोचवणं अगदी अवघड काम होतं. यामध्ये छोटीशी जरी चूक झाली असती, तरी चांद्रयान चंद्रावर क्रॅश झालं असतं. मात्र, सुदैवाने असं काही घडलं नाही.

चांद्रयान-३ ने यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून, यान अगदी सुस्थितित असल्याचं इस्रोने ट्विट करून सांगितलं आहे.

काय असणार पुढील वाटचाल?

यानंतर आता चांद्रयान-३ हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. उद्या (6 ऑगस्ट) रात्री ११ वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या, १४ ऑगस्टला चौथ्या आणि १६ ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल. (ISRO Chandrayaan-3)

१७ ऑगस्ट हा अतिशय महत्त्वाचा दिवस असेल. या दिवशी चंद्राच्या १०० किलोमीटर कक्षेमध्ये चांद्रयानाला पोहोचवण्यात येईल. पुढे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.

ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. तर, चंद्राच्या दक्षिण भागात लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरेल. त्यामुळे देशासाठी ही मोहीम अगदी ऐतिहासिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT