Chandrayaan 3 Update eSakal
देश

Chandrayaan 3 Update : चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं चांद्रयान-3; 'ऑर्बिट रिडक्शन' प्रक्रिया यशस्वी!

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 चंद्राभोवती फेऱ्या मारत एक-एक कक्षेतून पृष्ठभागाच्या जवळ जात आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान-3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. शनिवारी चंद्राच्या बाहेरच्या कक्षेत प्रवेश केलेल्या चांद्रयानाला आता आतील कक्षेत ढकलण्यात इस्रोला यश मिळालं आहे. चांद्रयान आता चंद्राभोवती 170x4313 किलोमीटर कक्षेमध्ये फिरत आहे.

हे चांद्रयान आता या कक्षेमध्ये चंद्राभोवती फेरी मारेल. यानंतर पुढे 9 ऑगस्ट रोजी ते आणखी आतल्या कक्षेत ढकलण्यात येईल. 14 जुलै रोजी अंतराळात झेप घेतलेलं चांद्रयान आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास 23 ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल.

असा असेल पुढील प्रवास

पृथ्वीवरुन ज्याप्रमाणे टप्प्या-टप्प्याने चांद्रयान बाहेर सोडण्यात आलं, त्याचप्रमाणे ते टप्प्या-टप्प्याने चंद्राजवळ नेण्यात येत आहे. हे चांद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारत एक-एक कक्षेतून पृष्ठभागाच्या जवळ जात आहे. 17 ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर स्थिरावेल. यानंतर 23 ऑगस्टला लँडिंगचा प्रयत्न होईल.

चंद्राचा व्हिडिओ

दरम्यान, चांद्रयान-3 काल चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं. यावेळी 'मी चंद्राचं गुरुत्वाकर्षण अनुभवत आहे' अशा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला होता. हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच, चांद्रयानाने चंद्राचा पहिला व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT