national flag Tiranga Sakal
देश

दिवसा- रात्री देखील तिरंगा फडकवता येणार; केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल

केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार असून पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेले तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेमध्ये करण्यात आलेले बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.

राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारताची ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकाविता येत असे तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT