Yogi Adityanath sakal
देश

संसदीय मंडळात योगींची वर्णी निश्‍चित

भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सलग विजयासह दुसऱ्यांदा सत्ता मिळविणारे मुख्यमंत्री ठरणारे योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रीय राजकारणात आणखी एक पाऊल पुढे पडण्याचे मजबूत संकेत मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचा दौरा करणारे योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित आहे. या मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू असल्याचेही द्योतक मानले जाते. योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरतील.

दिल्ली दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यूपीतील सुलताननगरचे नाव बदलून रामाचा पुत्र कुश याचे नाव त्या शहराला देण्याचाही मुद्दा दौऱ्यात त्यांच्या अजेंड्यावर होता. भाजपकडून लवकरच त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर भाजप संसदीय मंडळात तीन जागा रिक्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. वर्तमान समीकरणांप्रमाणे भाजपमध्ये मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे व त्यांचाच शब्द मोदींनंतर अंतिम मानला जातो. मात्र शहा मोदी यांचे पंतप्रधानपदाचे वारसदार ठरणार का, हा सवाल भाजपच्या अंतर्गत वर्तुळात विचारला जातो. दुसरीकडे योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशासारखे राज्य पुन्हा खेचून घेतल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा ‘ग्राफ' चढा आहे. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट'' बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपतीपदासाठी आनंदीबेन आघाडीवर

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये आहे. त्या पदासाठी यूपीच्या सध्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या आनंदीबेन यांना भाजपच्या नवीन रचनेत महत्वाचे स्थान आहे. त्या पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासू वर्तुळात दीर्घकाळापासून राहिलेल्या आहेत. शिवाय सध्या त्यांचे व योगी आदित्यनाथ यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आगामी राष्ट्रपतीपदी महिलाच असणार हे सूत्र भाजपने प्रत्यक्षात आणले तर द्रौपदी मुर्मू, सुमित्रा महाजन यांच्याबरोबर आनंदीबेन यांचेही नाव दिल्लीत चर्चेला आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT