ek palaniswami sakal
देश

Anna Dramuk Party : पलानीस्वामींकडे अण्णाद्रमुकची सूत्रे; सरचिटणीसपदी झाली निवड

माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांची आज अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

पीटीआय

माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांची आज अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

चेन्नई - माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांची आज अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यानुसार आता संपूर्ण पक्षावर पलानीस्वामी यांचे नियंत्रण राहणार आहे. अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्या सरचिटणीसपदाला आव्हान देणारी पनीरसेल्वम यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पलानीस्वामी यांचा सरचिटणीसपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पलानीस्वामी समर्थकांनी आनंद व्यक्त करत लाडू वाटले. दरम्यान, पलानीस्वामी यांनी मरिना बिचवर एमजीआर व जयललिता यांच्या स्मृतिस्थळी जाऊन पुष्प अर्पण केले.

पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी समर्थकांचे आभार मानले आहेत. पलानीस्वामी यांच्या निवडीने आनंदित झालेल्या नेत्यांनी, ‘अण्णाद्रमुक आणखी बळकट होईल,’ असा विश्‍वास व्यक्त केला. निवडीनंतर पलानीस्वामी यांनी सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा केली. नवीन सदस्यत्वासाठी आणि विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. अर्जाचे शुल्क दहा रुपये ठेवण्यात आले आहे.

अण्णाद्रमुकच्या ११ जुलै २०२२ च्या सर्वसाधारण बैठकीत पलानीस्वामी यांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्याचा ठराव मांडण्यात आला. याविरोधात ओ.पनीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांनी याचिका दाखल केली होती. ती याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सरचिटणीस म्हणून पलानीस्वामी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षाची धार त्याच बैठकीत तीव्र झाली होती. कारण या बैठकीत पनीरसेल्वम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अण्णाद्रमुकचा इतिहास

अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना १९७२ मध्ये अभिनेते आणि नंतर राजकारणात पदार्पण करणारे एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी केली. ते पक्षाचे पहिले सरचिटणीस होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत जे जयललिता या १९८९ ते २०१६ म्हणजे त्यांच्या मृत्युपर्यंत पक्षाच्या सरचिटणीस राहिल्या. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशीकला यांची पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. परंतु शशीकला यांना भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पक्षाच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या परिस्थितीत एमजीआर, व्हीआर नेदुशिळीयन, पी. यू. षण्मुगम, एस राघवानंदम आणि जयललिता यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

Crispy Rava Paneer Corn Pockets: नॉनव्हेजला ब्रेक, पण चवीला नाही! श्रावणात वीकेंडला बनवा हा कुरकुरीत नाश्ता

SCROLL FOR NEXT