esakal
देश

बॉस असावा तर असा! सव्वा कोटी खर्च करून कर्मचाऱ्यांना दिलं दिवाळी गिफ्ट

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू पाहून सुखद धक्का

सकाळ डिजिटल टीम

Diwali Gift दिवाळीचा सण जवळ आला आहे. या काळात व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत असतात. पण चेन्नईमधील एका व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना चक्क 1.2 कोटी रुपयांच्या कार आणि बाईक भेट देऊन कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. चलनी ज्वेलरीचे मालक जयंती लाल चैंती यांनी त्यांचे कर्मचारी आणि सहकार्‍यांना आठ कार आणि 18 बाइक भेट दिल्या.

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू पाहून सुखद धक्का बसला आहे, तर काहींना आनंदाश्रू अनावर झाले. जयंती लाल म्हणाले की, त्यांचे कर्मचारी हे त्यांच्या कुटुंबासारखे आहेत आणि प्रत्येक चढ-उतारात त्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. ते म्हणाले की ही भेट त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी विशेष जोडण्यासाठी आहे.

त्यांनी माझ्या व्यवसायातील चढ-उतारांवर माझ्यासोबत काम केलं आहे. आणि मला व्यवसायात खुप मदत केली आहे. ते पुढे म्हणाले, ते फक्त कर्मचारी नाहीत तर माझे कुटुंब आहेत. त्यामुळे त्यांना असे सरप्राईज देऊन माझ्या कुटुंबियांप्रमाणे वागावे असे मला वाटत होते. तेव्हापासून मी खूप आनंदी आहे. प्रत्येक बॉसने आपल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Turmeric Market Price : हळदीला सोन्याचा भाव! सांगलीच्या बाजार समितीत हळदीला क्विंटलला तब्बल 65 हजार रुपये दर; दुष्काळामुळे उत्पादनात 40 टक्के घट

Raigad News: कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला पालकमंत्र्यांचा पाठिंबा; ७० हजार झाडे तोडणार, ७५ हजार लावणार!

Bay of Bengal Low Pressure Area : राज्यात थंडीची चाहूल पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात निचांकी ११.३ अंश तापमानाची नोंद

IND vs NZ 4th ODI Live: रोहित शर्मा, इशान किशन यांच्याकडून मोठी चूक; आकिब नबीला राग अनावर, दोन चेंडूंत नाट्यमय घडामोडी Video Viral

Maharashtra Tunnel Road: प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात ३ भुयारी मार्ग; कुठून कुठे जाणार नवे मार्ग?

SCROLL FOR NEXT