crime esakal
देश

Crime News : दलित व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावली विष्ठा; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

ग्रीस असलेल्या हाताचा दुसऱ्या जातीतील व्यक्तीला चुकून स्पर्श झाल्याने त्याने मानवी विष्ठा आपल्या चेहरा व शरीराला लावल्याचा आरोप एका दलित व्यक्तीने केला.

सकाळ डिजिटल टीम

छत्तरपूर : ग्रीस असलेल्या हाताचा दुसऱ्या जातीतील व्यक्तीला चुकून स्पर्श झाल्याने त्याने मानवी विष्ठा आपल्या चेहरा व शरीराला लावल्याचा आरोप एका दलित व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी ओबीसी समुदायातील रामकृपाल पटेलविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे.

दशरथ अहिरवार असे या दलित व्यक्तीचे नाव आहे. अहिरवार यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता.२१) मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील बिकौरा गावात ही घटना घडली. ग्रामपंचायतीच्या नाल्याचे काम करत असताना पटेल शेजारील हातपंपावर अंघोळ करत होते. यावेळी, अहिरवार यांनी बांधकामासाठी हाताला ग्रीस लावले होते. या हाताचा स्पर्श चुकून पटेल यांना झाला.

त्यानंतर संतप्त झालेल्या पटेल यांनी अंघोळ करत असलेल्या तांब्यातूनच परिसरातून मानवी विष्ठा आणून अहिरवार यांच्या चेहरा व शरीराला लावली. पटेल यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही अहिरवार यांनी केला. ते पुढे म्हणाले, की मी यासंदर्भात ग्रामसभा बोलाविण्याची विनंती केली. मात्र, ग्रामपंचायतीने मलाच ६०० रुपयांचा दंड ठोठावला. काम सोडून जाता येत नसल्याने त्यादिवशी पोलिसांत तक्रार नोंदविली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चेष्टेतून घडलेला प्रकार?

उपविभागीय पोलिस अधिकारी मनमोहनसिंह बघेल म्हणाले, की याप्रकरणी रामकृपाल पटेल यांच्याविरुद्ध भादंवि २९४ आणि ५०६ नुसार तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. अहिरवार काम करत असताना शेजारी अंघोळ करणाऱ्या पटेल यांची चेष्टा करत होते. या चेष्टेतूनच ते एकमेकांवर वस्तू फेकत होते. त्यावेळी अहिरवार यांनी पटेल यांच्या हातावर ग्रीस लावल्यानंतर पटेल यांनी मानवी विष्ठा हाताने उचलून अहिरवारच्या पाठीवर फेकली. अहिरवार यांना ग्रामपंचायतीने दंड ठोठावल्याबद्दल माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT