Basavaraj Bommai ESakal
देश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून, अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत बसवराज बोमय्या (Basavaraj Bommai) यांनी व्यक्त केले आहे. ते आज पत्रकार परीषदेत बोलत होते. संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजी राजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी ही गोष्ट छोटी असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बंगळूर येथे शिवाजीराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बंगळूर येथे शिवाजीराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य केले असून, शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून बेळगावात मराठी भाषिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कायदा हाती घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही

बेळगावमध्ये घडलेला दगडफेक घटनेचा निषेध करतो. तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईबाबत आदेश गृहमंत्र्यांना दिले असून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच छोट्या मोठ्या कारणासाठी कायदा हातात घेऊन खाजगी, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्या विरोधामध्ये कठोर कारवाईचे आदेश बजावले असून कोणत्याही कारणाने हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या संदर्भात गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून सखोल चौकशी केली जाईल व प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील. खऱ्या देशभक्तांची ओळख पुढील पिढीला करून देण्याचा उद्देश असतो. त्यांची विटंबना करणाऱ्यांचा तपास घेतला जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT