chhatrapati shivaji Maharaj statue on LOC Jammu Kashmir kupwara marathi news  
देश

Jmmu Kashmir News : छत्रपती शिवरायांचा पुतळा देणार सीमेवर जवानांना प्रेरणा! 'या' तारखेला होणार अनावरण

हे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

रोहित कणसे

देशाच्या सीमारेषेवरील कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या लष्करी जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रेरणा देत राहाणार आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडाच्या लोलाब व्हॅलीमध्ये हा पुतळा उभारण्यात येणार असून त्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाणार असून त्यासाठी भूमिपूजनासाठी शिवरायांच्या किल्ल्यांवरून माती आणि पाणी आणण्यात आली आहे.

खास फायबरपासून बनवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २५ ऑक्टोबरला कुपवाड्यात पोहोचणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात तो प्रदर्शित केला जाईल. हा पुतळा महाराष्ट्रातून आणला जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरला पाठवला होता.

रस्त्याने वाहनाने काश्मीरमध्ये आणण्यात येणारा पुतळा सुरतमध्ये प्रदर्शीत करण्यात आला. आम्ही पुणेकर या स्वयंसेवी संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीसोबत कुपवाडा येथे पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी फेब्रुवारीपासून तयारी सुरू करण्यात आली होती.

उत्तर काश्मीरमधील एलओसीला लागून असलेल्या टिटवाल, तंगदार, केरन आणि मच्छलमध्ये मराठा लाईट इन्फंट्री अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहे. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आणि नियंत्रण रेषेवरील घुसखोरांविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लष्कराच्या ४१ आरआरची स्थापना प्रामुख्याने मराठा रेजिमेंटच्या सैनिकांमधूनच करण्यात आली आहे. जानेवारी २०२२ मध्ये नियंत्रण रेषेवर मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे बसवले होते. यापैकी एक पुतळा समुद्रसपाटीपासून १४८०० फूट उंचीवर एलओसीजवळ बसवण्यात आला आहे.

पुतळा करू शकते कोणत्याही हवामानाचा सामना

आम्ही पुणेकर या एनजीओचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी एका हिंद वृत्तपत्राली दिलेल्या माहितीदरम्यान सांगितले की, परिस्थिती अनुकूल असल्यास ७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.

आम्ही तेथे एक संग्रहालयही तयार करू. लष्कराने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नियंत्रण रेषेवर ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला जाणार आहे, त्या ठिकाणी शिवरायांच्या पदचिन्हांनी पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड आणि प्रतापगड किल्ल्यांची माती भूमिपूजनासाठी काश्मीरला नेण्यात आली आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, घोड्यावर स्वार झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा विशेष प्रकारची रसायने आणि फायबर मिसळून तयार करण्यात आला आहे. तो कोणत्याही हवामानाचे परिणाम सहन करू शकतो. तसेच हा पुतळा २५ वर्षे खराब होणार नाही. आम्ही हा पुतळा लोलाब व्हॅलीमधील कोणत्याही चौकात बसवणार नाही तर तो लष्करी प्रतिष्ठानात बसवला जाणार आहे . ज्या प्लॅटफॉर्मवर मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे तो तयार करण्या आला आहे. पुतळा बसवल्यानंतर स्टेज ग्रॅनाइटने सजवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT