Naxalite 
देश

छत्तीसगड : नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत ५ जवान शहीद, १० पेक्षा अधिक जखमी

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत, तर इतर १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत काही नक्षलवादी देखील मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुणे : सुमारे १२ टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन वर्गांना दांडी, पालकही गंभीर नसल्याचं उघड!

राज्याचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी शनिवारी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बिजापूर जिल्ह्यातील तर्रेम भागात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा बलांचे पाच जवान शहीद झाले. या घटनेत इतर १० जवान जखमी झाल्याची माहितीही मिळाली आहे. तर्रेम भागात सीआरपीएफच्या कोब्रा बटालियन, डीआयजी आणि एसटीएफच्या जवानांना नक्षलविरोधी अभियानात पाठवून देण्यात आलं होतं. जवानांची ही टीम जेव्हा या भागात होती तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला. 

पुन्हा लॉकडाउनचे दिवस, फ्रान्सनंतर बांगलादेशात निर्बंध; भारतातही निर्णयाची शक्यता?

दरम्यान, त्यांनी सांगितलं की सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. या घटनेत काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी जवानांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT