IED blast 
देश

छत्तीसगड : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद; IED स्फोटकांनी उडवली बस

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांची बस स्फोटकांनी उडवून दिली. या भीषण हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी सलग तीन IED चे स्फोट झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अवस्थी यांनी सांगितलं.

नक्षलविरोधी मोहिमेचे डीजी अशोक जुनेजा यांनी सांगितलं की, "नाराणयपूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिम सुरु होती. यावेळी डीआरजीचे जवान मोहिमेवरुन बसने संध्याकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास परतत होते. याचवेळी एका पूलावर तीन IED स्फोट झाले. स्फोटामुळे बसचा चालक आणि दोन जवान जागेवरच ठार झाले. तर दोन जवानांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला."

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमी जवानांना योग्य प्रकारे उपचार देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा बलाला घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT