देश

छत्तीसगडमध्ये दुर्गा मिरवणुकीत जीपने २० जणांना चिरडलं!

छत्तीसगडमध्ये दुर्गा मिरवणुकीत जीपने २० जणांना चिरडलं!

ओमकार वाबळे

छत्तीसगडमध्ये दुर्गा मिरवणुकीत जीपने २० जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चौघांना मृत्यू झाला असून अन्य काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

जशपूरमध्ये दुर्गा रॅली दरम्यान ही घटना घडली आहे. जशपूर जिल्ह्यात दसऱ्याच्या मूहूर्तावर दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी एका चारचाकीने मिरवणुकीतील सर्वांना चिरडले. अन्य काही व्यक्ती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. संतप्त नागरिकांनी ही चारचाकी पेटवून दिली आहे. पत्थलगावात सुरू असलेल्या या मिरवणुकीत ६-७ दुर्गा मंडळे एका ठिकाणी जमले होते. यावेळी कारने जमावात घुसत नागरिकांना चिरडलं.

बबलू विश्वकर्मा यांचा मुलगा राधेश्याम विश्वकर्मा (वय 21) असे एका आरोपीचे नाव असून तो बधान, सिंगरौली, मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव रामजन्मा साहू आहे. तो 26 वर्षांचा असून दोघेही मध्य प्रदेशातील बाबरगव्हाण आणि सिंगरौलीचे रहिवासी आहेत. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते छत्तीसगडमधून जात होते.

या घटनेनंतर स्थानिकांनी काही वेळ रास्तारोको केला. मात्र पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्वांना शांततेचे आवाहन केले. या घटनेनंतर वातावरण तापल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : राहुल गांधी कोण आहेत हे भारतातील जनतेला माहित आहे - फडणवीस

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT