BJP appointed 30 workers for one booth Kasba bypoll Election politics congress  esakal
देश

Vidhan Sabha Elections: छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या निवडणुकांची लवकरच घोषणा?; भाजपनंतर काँग्रेसकडून महत्वाच्या नियुक्त्या

भाजपनं घोषणेपूर्वीच उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केलीए तर काँग्रेसनं या राज्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यात.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगानं या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्याआधीच भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

तर काँग्रेसकडून या राज्यांतील निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळं लवकरच या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. (Chhattisgarh Madhya Pradesh Vidhan Sabha Elections Imp appointments from Congress and BJP)

काँग्रेसकडून नियुक्त्या

काँग्रेसनं वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांची गुजरातसाठी सरचिटणीस प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर रणदीपसिंह सुरजेवाला यांची मध्य प्रदेशसाठी सरचिटणीस प्रभारी ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर आमदार अजय राय यांची उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

भाजपची पहिली यादी जाहीर

दरम्यान, भाजपनं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेशातील ३९ उमेदवारांचा तर छत्तीसगडमधील २१ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं नाव या पहिल्या यादीत आलेलं नाही. तसेच छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाचाही अद्याप यादीत समावेश झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT