आत्महत्या  sakal
देश

भाजपच्या माजी मंत्र्याची गळफास घेऊन आत्महत्या

नामदेव कुंभार

Chhattisgarh ex-minister dies by suicide : छत्तीसगडचे भाजपचे माजी परिवाहन मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया (BJP Leader Rajinderpal Singh) यांनी राहत्या घरी गाळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रजिंदरपाल सिंग यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

छत्तीसगड येथील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून राजिंदरपाल सिंग भाटिया तीन वेळा आमदार राहिले आहेत. रमन सिंह सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी सीएसआईडीसीचे चेअरमनपद भूषावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रजिंदरपाल सिंग भाटिया लहान भावासोबत छुरिया येथे राहत होते. रविवारी सांयकाळी ते एकटेच घरी होते. कुटुबांतील सदस्य जेव्हा घरी पोहचले तेव्हा ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकराणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांना त्याठिकाणी कोणताही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे रजिंदरपाल सिंग यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रजिंदरपाल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चांगल्या चालणाऱ्या मालिकेतून घेतली एक्झिट; मग २० दिवसात मालिकाच संपली; आता पुन्हा भेटीला येतेय गाजलेली अभिनेत्री

Makar Sankranti Horoscope 2026: आता प्रतीक्षा संपली... यंदाच्या मकर संक्रांतीपासून 'या' राशींचे सुरू होणार सुवर्णदिवस; तुमचं काय होईल?

Latest Marathi News Live Update: शेत रस्त्याच्या वादातून दोघांना कुऱ्हाड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण

Mumbai Municipal Election : मराठी मतदारांचा कौल कुणाला? सर्वपक्षीयांचा व्होट बँक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न

DMart मध्ये संक्रांती स्पेशल सेल! 99 पासून लेडिज ड्रेस अन् 199 मध्ये पुरूषांच्या कपड्यांचे सेट, कोणत्या कपड्यांवर किती डिस्काउंट पाहा

SCROLL FOR NEXT