बस्तर : छत्तीसगडमध्ये भीषण दुर्घटना घडली असून एक चुनखडीची खाण खचल्यानं त्यामध्ये गाडले गेल्यानं सात मजुरांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. पोलीस आणि SDRFची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. (Chhattisgarh Seven people killed while extracting limestone from a mine)
या दुर्घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुर्घटनेत जीव गमावलेल्या कामगारांप्रती शोक व्यक्त केला आहे. तर माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनी ट्विट करुन म्हटलं की, मालगाव, जगदलपूरमध्ये मातीची खाण खचल्यानं ७ कामगारांचा मृत्यू झाल्याचं कळलं. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुबियांना योग्य नुकसान भरपाई मिळाली अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.