drunk teacher Esakal
देश

Viral video: वा रे पठ्ठ्यांनो! दारु पिऊन शाळेत आलेल्या शिक्षकाला घडवली अद्दल; व्हिडिओ पाहाच

Students chase drunk teacher funny Video: शाळेत आलेला शिक्षक शिकवण्याचे काम सोडून विद्यार्थ्यांना त्रास देत होता. शिक्षकाच्या या वागणुकीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला.

कार्तिक पुजारी

रायपूर: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, शाळेमध्ये आलेल्या एका व्यक्तीला विद्यार्थी चप्पल फेकून मारत आहेत. इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, व्हिडिओतील व्यक्ती शिक्षक असून तो दारु पिऊन शाळेत आला होता. व्हिडिओ छत्तीसगडच्या बस्तरमधील एका प्राथमिक शाळेतला आहे. माहितीनुसार, व्हिडिओ आठवड्यापूर्वीचा आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक दारु पिऊन शाळेत आला होता. तो नेहमीच मद्याच्या अमलाखाली असतो. शाळेत आलेला शिक्षक शिकवण्याचे काम सोडून विद्यार्थ्यांना त्रास देत होता. शिक्षकाच्या या वागणुकीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाला चप्पलांचा मारा करुन पिटाळून लावले आहे.(Chhattisgarh students chase drunk teacher away throw slippers at him Viral video)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, विद्यार्थ्यांनी चप्पलांचा मारा सुरु केल्यानंतर शिक्षक पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या टूव्हिलरवर गडबडीत बसतो आणि तेथून धूम ठोकतो. मात्र, विद्यार्थी त्याच्या मागे लागतात आणि चप्पल त्याच्या दिशेने फेकतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संपाताची लाट उसळली आहे. असे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार, उलट त्यांनाच शिक्षणाची गरज आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

नेहमी येतो दारु पिऊन

स्थानिकांच्या माहितीनुसार, शिक्षक नेहमी दारु पिऊन शाळेत येतो. शाळेत आल्यानंतर तो विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट, शाळेमध्ये सतरंजी टाकून निवांत झोपी जातो. विद्यार्थी शिक्षकाकडे शिकवण्याची विनंती करतात, पण तो काही ऐकत नाही. याच प्रकाराला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी शिक्षकाला शाळेतूनच हाकलून लावले. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आणि व्हायरल केला.

गेल्या काही दिवसांमध्ये अशाच प्रकारचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. शिक्षक शाळेमध्ये दारु पिऊन येत आहेत.अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांमधून होत आहे. कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत असे दारुडे शिक्षक सुधारणार नाहीत अशी लोकांची भावना आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel - Iran War युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं

SCROLL FOR NEXT