CRPF 
देश

छत्तीसगढ-तेलंगना सीमेवर चकमक; ६ नक्षलवादी ठार

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगढ-तेलंगना सीमेवर पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६ नक्षलवादी ठार झाले आहेत.

छत्तीसगढच्या (Chattisgadh) नक्षलग्रस्त भागात (Naxal Area) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. तेलंगना सीमेवर (Telangana) सुरु असेलल्या चकमकीत काही नक्षली ठार झाले असून यातील ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप सीमेवर चकमक सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. छत्तीसगढमधील सुकमा (Sukama) जिल्ह्यात संयुक्त पथकाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोहिम सुरु आहे.

आतापर्यंत ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहे. शिवाय आणखी दोन मृतदेह असल्याचंही सांगितलं जात आहे. जंगलात जवान आणि नक्षलींमध्ये चकमक सुरु आहे.

किस्तराम पीएसच्या (Kistaram PS) जंगल भागात चकमक झाली. यामध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती एसपी सुनिल दत्त (SP Sunil Dutta) यांनी दिली. भाद्राद्री कोथागुडेम जिल्ह्याचे ते पोलिस अधिक्षक आहेत. तेलंगना, छत्तीसगढ पोलिस आणि सीआरपीएफच्या (CRPF) संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अद्याप नक्षलींचा शोध सुरु असल्याची माहितीसुद्धा सुनिल दत्त यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT