CM Bhupesh Baghel Sakal
देश

Chhattisgarh: १५ लाख नोकऱ्या अन् शेतकरी योजना; वाचा मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

नारायणपूरमधील एका सभेत मुख्यमंत्री भूपेश बघेल बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : छत्तीसगढमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायल मिळतंय. छत्तीसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी आता विकासकामावर जोर धरल्याचं दिसतंय. छत्तीसगढमध्ये आज मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी येत्या पाच वर्षात छत्तीसगढ रोजगार मिशनच्या माध्यमातून तब्बल १२ ते १५ लाख बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काम करत असल्यांचं म्हटलं आहे. तसेच ते सभेत बोलताना पुढं म्हणाले की, आम्ही तब्बल १७१ स्वामी आत्मानंद इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु केल्या आणि आता अशा प्रकारच्या हिंदी माध्यमातील ३२ शाळा स्थापण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते नारायणपूरमधील एका सभेत बोलत होते.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासींचे वर्षानुवर्षे शोषण केले जात होते, पण त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तेंदू रजा वसुलीचे पैसे २,५०० रुपयांवरून ४,००० रुपये केले आहेत. यामुळे आदिवासींचा फायदा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान सभेत पुढं बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना आता राजीव गांधी किसान न्याय योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यपालन, सौरऊर्जा आणि ठिंबक सिंचनासाठी सुद्धा या योजनांचा फायदा घेता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बोलताना सांगितलं आहे.

नारायणपूरमध्ये १२७ कोटी किंमतीचे १०१ प्रकल्प सुरु केल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच अनेक आव्हाने असूनही अबूजमर्हमध्ये आम्ही विकासाला प्राधान्य दिले आहे. आम्ही रस्त्यांचा विकास, शैक्षणिक आणि आरोग्यासंदर्भातील सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. असं मुख्यमंत्री भूपेश बघेल नारायणपूर येथील सभेत बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT