Chidambaram
Chidambaram 
देश

चिदंबरम यांना ‘ईडी’कडून अटक

पीटीआय

नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार-प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज तिहार तुरुंगातून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली. तत्पूर्वी स्थानिक न्यायालयानेच ‘ईडी’ला चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच गरज भासल्यास त्यांना अटक करण्याची परवानगी दिली होती. या अटकेच्या प्रक्रियेनंतर ‘ईडी’ने विशेष न्यायाधीश अजकुमार कुहार यांच्याकडे धाव घेत चिदंबरम यांच्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांनाच हजर करण्यासाठीचे वारंट बजावले तसेच आम्ही यावर उद्या (ता.१७) रोजी आदेश देऊ, असे सांगितले. आजच्या सुनावणीवेळी न्यायालयानेच ३ वाजता चिदंबरम यांना सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका गैरव्यवहार प्रकरणामध्ये चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याविरोधात आरोपपत्र सादर करण्याची तयारी चालविली आहे.

‘ईडी’च्या तीन अधिकारी आज सकाळी न्यायालयात आले, यानंतर त्यांनी दोन तास चिदंबरम यांची चौकशी करून त्यांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये चिदंबरम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून चदंबरम यांची आज तुरुंगामध्ये चौकशी होत असताना त्यांचे पुत्र कार्ती आणि पत्नी नलिनी हे दोघेही उपस्थित होते. या गैरव्यवहार प्रकरणात कार्ती हेदेखील आरोपी असून, याआधी सीबीआयनेही त्यांना अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT