CJI Chandrachud reaction esakal
देश

DY Chandrachud : तास-तास उशिरा जाणाऱ्यांनो, वाचा! सरन्यायाधीशांना पोहोचायला फक्त १० मिनिटं झाली म्हणून...

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वक्तशीर म्हणून ख्याती आहे.

वैष्णवी कारंजकर

भारतात ठरलेल्या ठिकाणी उशिरा जाणं, विशेषतः अधिकारी नेत्यांनी, हे अगदीच सामान्य आहे. या गोष्टीचं कोणाला विशेषही वाटत नाही. भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी फक्त १० मिनिटे उशीर झाल्याने माफी मागितली आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वक्तशीर म्हणून ख्याती आहे. त्यांनी फक्त १० मिनिटांनी उशिरा आल्याने माफी मागितल्याने इतर प्रशासकीय अधिकारी तसंच नागरिकांनाही वक्तशीरपणाचा संदेश दिला आहे. निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी याबद्दलचा किस्सा माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह म्हणाले की, एक दिवस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोर्टरुममध्ये पोहोचायला १० मिनिटे उशीर झाला. त्यानंतर त्यांनी कोर्टातल्या सगळ्यांची माफी मागितली. ते म्हणाले की, मला माफ करा, मी सहकाऱ्यांसोबत काहीतरी चर्चा करत होतो, म्हणून उशीर झाला.

प्रदीप कुमार सिंह पुढे म्हणाले,"ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचं काटेकोरपणे पालन करतात. इतरांनीही वेळेचं भान ठेवून न्यायालयात यावं, अशी त्यांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT