देश

दिल्लीतील रुग्णांसाठी नवे ‘कोरोना ॲप’; रुग्णालयातील रिकाम्या खाटांची माहिती मिळणार 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोणत्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी किती खाटा रिकाम्या आहेत याची तत्काळ माहिती मिळविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एका मोबाईल ॲप्लिकेशनची घोषणा केली. मात्र घरी राहूनच कोरोनापासून बचाव करा व जास्तीत जास्त काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले. 

केंद्र सरकारचे ‘आरोग्य सेतू’ हे बहुचर्चित ॲप आधीपासूनच कार्यरत आहे. दिल्लीत कोरोना संशयित रुग्णांना जागेसाठी रुग्णालयांतून वणवण करावी लागत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला तर एकाही रुग्णालयाने भरती करवून घेतले नाही. परिणामी त्याने काही वेळातच प्राण सोडला. यांसारख्या अनेक घटना समोर आल्यानंतर रुग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेबाबत उपायांची चाचपणी करीत असताना दिल्ली सरकारने आज हे नवीन ॲप सुरू केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे ‘ॲप’ 
कोरोना उपचाराची सुविधा असलेल्या दिल्लीतील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांचीही माहिती या ॲपमध्ये मिळेल असे सांगितले जात आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. व्हॉट्‌सअप नंबर ८००००७७२२ या क्रमांकावरही ती माहिती मिळू शकते. स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठी १०३१ या हेल्पलाईन क्रमांकाची सेवा उपलब्ध केली आहे. दिवसातून दोनदा हे ॲप अद्ययावत करण्यात येणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीतील रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी खाटांची कमतरता नाही. सध्या चार हजार १०० खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरही पुरेसे आहेत. 
अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT