children gave piggy bank to rahul gandhi emotional video goes viral during bharat jodo yatra  
देश

Viral Video : 'भारत जोडो'ला लहानग्यांचा हातभार! राहुल गांधींना सोपवला पैशांचा गल्ला

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशात आहे. राहुल गांधी यांच्या या पद यात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळत आहे. मध्य प्रदेशातील दोन लहान मुलांनी देखील राहुल यांची भेट घेत त्यांना अनोखा पाठिंबा दिला. शुक्रवारी झालेल्या या भेटीचा अतिशय भावूक व्हिडिओ समोर आला आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शुक्रवारी दोन मुलांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हे दोखे भोपाळमधील भाऊ आणि बहिणी त्यांची पिग्गी बँक घेऊन राहुल गांधींना भेटण्यासाठी खंडवा येथे पोहोचले होते. खांडव्यातील सनावद येथे त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. जेव्हा त्याने त्यांचा गल्ला (पिग्गी बँक) राहुल गांधी यांना सोपवली. हे दृश्य पाहून उपस्थितांपैकी अनेक जण भावूक झाले. व्हिडीओमध्ये 4 मुले राहुल गांधी यांना पिग्गी बँक्स देताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान राहुल गांधी ३० नोव्हेंबरला सकाळी उज्जैनहून थेट गुजरातला रवाना होतील. विमानाने गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी निवडणूक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तेथून सायंकाळी ते पुन्हा उज्जैनला येतील. १ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा यात्रा उज्जैन येथून निघणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच राजस्थानमध्ये दाखल होईल. यात्रा ४ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातून झालावाड जिल्ह्यात दाखल होणार आहे. ७ डिसेंबर रोजी यात्रा कोटा शहरात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT