China Border esakal
देश

China Border : जगातील सर्वात उंच रस्ता बनवून भारत देणार आता चीनला आव्हान

भारत चीनच्या सीमेनजिक बनवतोय जगातील सर्वात उंच रस्ता

सकाळ डिजिटल टीम

China Border : आता भारत चीनच्या सीमेनजिक बनवतोय जगातील सर्वात उंच रस्ता. इथे फायटर जेट बेस देखील बनवला जाईल, जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता येईल. आतापर्यंत जगातील सर्वात उंच रस्त्याचा विक्रमही भारताच्या नावावर होता. त्याचे बांधकाम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केले होते.

भारताने चीनच्या सीमेनजीक जगातील सर्वात उंच रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. हा रस्ता 19400 फूट उंचीवर बांधला जात आहे, जो बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्वतःचाच विक्रम मोडीत काढेल. याठिकाणी फायटर जेट बेसही बांधण्यात येणार आहे, जेणेकरून चीनसोबत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या रस्त्याचा वापर करून चीनला चोख प्रत्युत्तर देता येईल.

आतापर्यंत जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंग ला येथे आहे, तो 19024 फूट उंचीवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधला आहे. लष्कराच्या वाहनांच्या ये-जा करण्यासाठी हा रस्ता खास तयार करण्यात आला होता. हा रस्ता बीआरओच्या महिला अधिकारी वैशाली एस हिवासे यांच्या नेतृत्वाखाली बांधला आहे. सर्वात उंच रस्ता म्हणून या रस्त्याचं नाव गिनीज बुकमध्येही नोंदवलं गेलं. आता 19400 फूट उंचीवर बांधलेला लिकारू-मिग ला-फुक्चे रस्ता त्याचा विक्रम मोडीत काढेल.

चीनच्या सीमेपासून फक्त 3 किमी अंतर दूर

लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये हा नवीन रस्ता बनवला जात आहे. बीआरओनेच या रस्त्याचं काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. लिकारू-मिग ला-फुक्चे या नावाने ओळखला जाणारा रस्ता धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. 19400 फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी तो बांधला जाणार आहे.

उमलांग ला पास ओलांडणारा हा जगातील सर्वात उंच रस्ता ठरणार आहे. चीनच्या सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा रस्ता केवळ तीन किलोमीटर अंतरावर असल्याने त्याचे सामरिक महत्त्वही स्पष्ट होते. बीआरओच्या महिला युनिटने या रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. कर्नल पोनुंग डोमिंग या त्यांचं नेतृत्व करत आहेत. या रस्त्याच्या कामात कर्नल डोमिंग यांच्यासोबत इतर महिला अधिकारीही उत्साहाने गुंतल्या आहेत.

एअरफील्ड अपग्रेड केले जाईल

या रस्त्याच्या बांधकामासोबतच, वास्तविक नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या न्योमा एअर फील्डची नव्याने सुधारणा केली जात आहे. या वर्षी येथून लढाऊ विमानांचे उड्डाण सुरू होईल. 1962 च्या युद्धानंतर ही हवाईपट्टी वापरात नव्हती. 2009 मध्ये त्याच्या अपग्रेडेशनचे काम सुरू झाले. मग ते थांबले. आता येत्या काही महिन्यांत तो तयार होईल. हे ठिकाण 14 हजार फूट उंचीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT