देश

चमोलीमध्ये चीनने घुसखोरी केल्याचे उघड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चिनी सैनिकांनी गेल्या आठवड्यात उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक किलोमीटर आत घुसखोरी करत मेंढपाळांना धमकावल्याचे उघड झाले आहे. 25 जुलैला बारहोती भागात ही घटना घडली. डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला महत्त्व आले आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी 25 जुलैला सकाळी घुसखोरी करत मेंढपाळांना जागा सोडून जाण्यास धमकावले. बारहोती हा 80 किमीचा उताराचा पट्टा असून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून 140 किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश असलेल्या या 'मध्य भागा'त (मिडल सेक्‍टर) बारहोती हे सीमेवरील ठाणे आहे.

हा लष्करमुक्त भाग असून, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना येथे शस्त्रे घेऊन येण्याची परवानगी नाही. 1958 मध्ये भारत आणि चीनने चर्चा करून बारहोती हा वादग्रस्त भाग म्हणून मान्य करत येथे सैन्य न पाठविण्याचे मान्य केले होते. 1962 च्या युद्धातही चीनने मध्य भागात सैन्य घुसविले नव्हते, तर पूर्व भाग (अरुणाचल प्रदेश) आणि पश्‍चिम भागामध्ये (लडाख) कारवाया केल्या होत्या.

सीमावादाबाबत जून 2000 मध्ये झालेल्या चर्चेवेळी, बारहोती, कौरील आणि शिपकी या तीन भागांमध्ये 'आयटीबीपी'चे जवान शस्त्रे घेऊन जाणार नाहीत, असे भारताने मान्य केले होते. त्यामुळे जवान येथे नागरी वेशात गस्त घालत असतात. या भागात भारतीय मेंढपाळ आणि तिबेटमधील लोक त्यांचे याक चरण्यासाठी घेऊन येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉलेजियमच्या निर्णयांवरून माजी न्यायमूर्ती आमनेसामने; जस्टीस कौल यांच्या आरोपाला चंद्रचूड यांनी दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले?

Manoj Jarange,:ध्वनिफीत प्रकरणातील सत्य समाजासमोर आणणार; मनोज जरांगे यांचा निर्धार

European Roller Bird Spotted In Kolhapur : हजारो किलोमीटरचा प्रवास करून थेट कोल्हापुरात मुक्काम; महेच्या डोंगराळ भागात दिसला दुर्मीळ 'युरोपियन रोलर', पक्षाची काय आहे खासियत?

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Aaditya Thackeray: हिंजवडीसाठी निधी मंजूर, तरीही कामे ठप्प; समस्यांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT