china is gone from ladakh Revealed from satellite photos 
देश

चीनचा पूर्व लडाखमधून काढता पाय; सॅटेलाईट फोटोंमधून उघड

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली- भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला वाद आता निवळताना दिसत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलआय) गलवान खोरे, हॉट स्प्रिंग एरिया आणि गोगरा  येथून मागे हटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन ठिकाणचे आरंभिक डिसएंगेजमेंटचे काम पूर्ण झाले आहे. पैंगोंग त्सो भागातील सैन्य संख्याी चीन कमी करत आहे. असे असले तरी भारतीय सैन्य चीनच्या या हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहे. तसेच भारतीय हद्दीत चीन पुन्हा घुसखोरी करणार नाही याबाबात दक्षता घेत आहे. 

कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या पुण्यातील लॅबवर कारवाई 
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर 30 जून रोजी भारत आणि चीनच्या लेफ्टिनेंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती. यात गलवान खोरे, हॉट स्प्रिंग एरिया, पैंगोंग त्सो आणि गोगरा या भागातून सैन्य मागे घेण्याच्या बोलणीवर सहमती झाली होती. यानंतर उभय देशांनी दीड ते दोन किलोमीटरपर्यंत आपलं सेन्य मागे घेण्यास सुरुवात केली. गलवान खोरे आणि हॉट स्प्रिंग भागातून चिनी सैन्य गेल्याची पुष्टी उपग्रह छायाचित्रातून झाली आहे. मागे हटण्याच्या प्रक्रियेनुसार भारतीय सैन्य पीपी 14 वर गस्त घालणे (पेट्रोलिंग) निलंबित करण्यावर सहमती झाली आहे. असे अलसे तरी ड्रोनद्वारा या भागाची पाळत ठेवली जात आहे.

15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने आपली जीवितहानी जाहीर करण्यास नकार दिला होता. 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यामुळे उभय देशांमधील स्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांची जुळवाजुळव सुरु केली होती. शिवाय शस्त्रास्त्र साठाही सीमा भागात वाढवण्यात आला होता.

शाळा लवकरात लवकर सुरु करा,अन्यथा...; ट्रम्प यांचा राज्यांना गंभीर इशारा
चीनला धडा शिकवण्यासाठी भारताकडून इतर मार्गांचा वापर करण्यात आला. टिकटॉकसह 59 चिनी कंपन्यांच्या अॅपवर भारताने बंदी आणली होती. तसेच भारतातील चिनी कंपन्यांच्या गुंतवणूकीवर भारताने निर्बंध आणले होते. भारताने आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचेही प्रयत्न चालवले होते. त्यामुळे चीनवर सैन्य मागे घेण्याचा दबाव वाढत होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत दुरध्वनीवर दिर्घकाळ चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सहमती होऊन उभय देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील वाद निवळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT