China launches ambitious Mars mission  
देश

भारताच्या इर्षेवर चीनने आखलीय 'ही' महत्त्वाकांक्षी मोहीम...

संजय उपाध्ये

कोल्हापूर - भारताने सहा वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या कक्षेत यान पाठवून 'मंगळयान' मोहीम यशस्वी केल्यानंतर आता आपला सर्वच क्षेत्रातील प्रतिस्पर्धी चीननेसुद्धा ही मोहीम हाती घेतली आहे. भारताच्या यशाचे जगभर झालेले कौतुक पाहून आतून दुखावलेल्या आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीननेसुद्धा मोहीम जोमाने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत या वर्षीच म्हणजेच येत्या दोन महिन्यात मंगळाकडे यान पाठविण्याचा निर्धार चीनने केला आहे.

चीनच्या आगामी तीन अतिशय महत्त्वाच्या मोहिमापैकी एक असलेल्या या मोहिमेद्वारे मंगळाच्या कक्षेत यान पाठविणे आणि ते मंगळवार उतरविणे हे ध्येय आहे. भारताने मात्र सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 लाच मंगळाच्या कक्षेत यान पाठविले होते. हे यश संपादन करणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला होता. तसेच आजपर्यंत युरोपीय संघ, रशिया, अमेरिका आणि भारत असे केवळ चारच देश मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविले आहेत. तसेच पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पाठविणारा जगाच्या पाठीवर एकमेव देश असे बिरुदही भारताला मिळाले होते. मंगळ मोहिमेसाठी मोठा खर्च येतो. युरोपीय संघ आणि अमेरिका यांनी तसा खर्चसुद्धा केला आहे. पण भारताने त्यावरही कडी करत केवळ 450 कोटी रुपयांत 'मंगळयान' मोहीम यशस्वी केली आहे. 2014 लाच 'ग्रॅव्हीटी' हा हॉलिवूड चित्रपट मंगळाचीच कथा घेऊन आला होता. या चित्रपटावरही 450 कोटी रुपये खर्च झाले होते. म्हणजे एका चित्रपटाच्या खर्चात भारताने 'मंगळयान' मोहीम पूर्ण केली होती. इतक्‍या कमी खर्चात मोहीम पार पाडल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, वैज्ञानिकांनी तोंडात बोटे घातली होती.
आता जर चीनची मोहीम यशस्वी झाली तर आपल्यानंतर आशियाचा तो दुसरा देश बनेल. चीनने यानाचे नाव ठेवले आहे, तियानवेन -1. तर 'लॉंग मार्च-5' हे रॉकेट तियानवेन-1 ला अवकाशात घेऊन जाईल. "तियानवेन'चा अर्थ आहे "स्वर्गीय प्रश्‍न' अथवा 'स्वर्गातून प्रश्‍न'. चिनी राष्ट्रीय अंतरिक्ष प्रशासनाने हे नाव ठेवले आहे. त्यांच्याद्वारेच ही मोहीम राबविण्यात येत आहे. 'तियानवेन' हे नाव चीनचे सुप्रसिद्ध कवी कु युआन यांनी लिहिलेल्या एका कवितेतून घेतले आहे.

'वेल डन इंडिया, बट'....

भारत आणि चीनचे जमिनीबरोबर अवकाशातही युद्ध सुरू आहे. भारताने 2017 मध्ये एकाचवेळी 104 यान आकाशात सोडून अतिशय दुर्मिळ असा विक्रम केला होता. भारत हा चीन, अमेरिका, युरोपीय संघ, जपान यांना सोडून अंतरिक्ष कार्यक्रमात फार पुढे गेला, अशी जगभर चर्चा झाली. त्यावेळी सैरभैर झालेली चिनी माध्यमांनी 'वेल डल इंडिया, बट वुई आर वे अहेड' अशी मखलाशी केली होती. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT