esakal
देश

चायनीज मांजाचा प्रताप : बुलेट थांबेपर्यंत कापला गेला गळा, युवकाचा मृत्यू

चायनीज मांजामुळे एका तरुणाचा गळा कापल्याची घटना दिल्ली येथील हैदरपुरमध्ये घडली.

धनश्री ओतारी

चायनीज मांजामुळे एका तरुणाचा गळा कापल्याची घटना दिल्ली येथील हैदरपुरमध्ये घडली. तरुण बाईकवरुन फ्लायओवरवरुन जात होता दरम्यान, त्याच्या गळ्याला चायनीज मांजा लागला त्याची गाडी थांबेपर्यंत तरुणाचा गळा कापला गेला.(chinese manja death man on bike dies delhi)

या मृत तरुणाची ओळख पटली असून सुमित रंगा वय ३० असे आहे. यावेळी तो फ्लायओवरवरुन बुरारी येथील स्वतःच्या हार्डवेअर शॉपमधून जवळपास साडे सहाच्या दरम्यान घरी जात होता. याचदरम्यान, तरुणाच्या गळ्याभोवती माजा अडकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमितची बाईक थांबेपर्यंत त्याच्या शरिरातून भरपुर रक्त वाहिले. काही तास तो तसाच तडफडत राहिला. एका वाहनधारकाने ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या गळ्यामध्ये मांजाचा तुकडा अडकला होता.

पोलिसांनी मांजाचा तुकडा पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुमितचे वडिल राम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सुमितने कॉल करुन मांजामुळे गळा चिरला अशी माहिती फोन करुन दिली होती. त्यावेळी तो बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यावेळी एक तरुणाने सुमितच्या मोबाईलवरुन कॉल करत ही माहिती घरी कळवली.

सुमित (३०) हा वडील राम कुमार (६४), आई वीरेंद्र कुमारी (६०) आणि पत्नी अवंतिकासह, रोहिणी सेक्टर-१ येथे राहत होता.

नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सुमित घरातून बुरारी येथील हार्डवेअरच्या दुकानात गेला होता. तेथून सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून दुचाकीने घरी परतत होता. त्यानंतर हैदरपूर-बदली मोर मेट्रो स्थानकासमोरील उड्डाणपुलावर आल्यानंतर तो मांजा गळ्याला अडकला. यामुळे त्याची मान कापली गेली. त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून रस्त्याने जाणाऱ्या दोघांनी सुमितला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी सुमितला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT