Indian Army esakal
देश

सीमेजवळ चीनने युद्ध सराव वाढवला, आर्मी सुद्धा अ‍ॅक्शनसाठी सज्ज

"चिनी सैन्याचा एकत्रित संयुक्त सराव सुरु आहे. सैन्यातील वेगवेगळ्या घटकांना त्यांनी एकत्र आणलं आहे"

दीनानाथ परब

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये (East ladakh) नियंत्रण रेषेजवळ चीनच्या (china) कुरापती सुरु असताना आता अरुणाचल प्रदेशमध्येही (Arunachal pradesh) चीनच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. चिनी सैन्याने (Pla) वार्षिक कवायतींबरोबरच सीमेवरील गस्त काही प्रमाणात वाढवली आहे, असे पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

"चिनी सैन्याचा एकत्रित संयुक्त सराव सुरु आहे. सैन्यातील वेगवेगळ्या घटकांना त्यांनी एकत्र आणलं आहे. या वर्षी सरावाचे प्रमाण वाढलं असून दीर्घकाळ सराव सुरु आहे" असे लेफ्टनंट जनरल पांडे यांनी सांगितलं. "काही भागांमध्ये पीएलएची गस्त वाढली आहे. पण पेट्रोलिंगच्या पद्धतीमध्ये मोठा बदल झालेला नाहीय. वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही वाढवण्यात आले आहेत" असे पांडे म्हणाले.

"मागच्या दीड वर्षाचा काळ आमच्यासाठी चिंतेचा विषय होता. कुठल्याही कुरघोडीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्व कमांडने तयारी आणि क्षमता वाढवली आहे" असे पूर्व भागाचे लष्करी कमांडर म्हणाले. चीनला लागून असलेल्या सीमा भागात भारताने इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यावर भर दिला आहे.

रस्ते, पुल, बोगदे बांधण्याचे काम भारतात युद्धपातळीवर सुरु आहे. भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात टेहळणी करणाऱ्या ड्रोन्सचा समावेश केला आहे. अत्याधुनिक रडार्स, संपर्क यंत्रणा आणि रात्रीच्या वेळी हालचाली टिपण्याची क्षमतेमध्ये वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

SCROLL FOR NEXT