chinese soldiers captured by india indian army ladakh border region 
देश

लडाखमध्ये सीमेवर चिनी सैनिकाला ताब्यात घेतले; लष्कराची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

लडाख : भारत-चीन सीमेवरील तणाव अद्याप निवळलेला नाही. दोन्ही बाजूंच्या लष्करी पातळीवरील चर्चेच्या आणखी फेऱ्या सुरू होत असतानाच आज सीमेवर भारतीय लष्कराने एका चिनी सैनिकाला पकडले आहे. या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. लष्करानेच याबाबतची माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार लडाखमधील चुमार-डेमचोक परिसरात एक चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसला होता. त्याला लष्कराने ताब्यात घेतले आहे. संबंधित सैनिकाच्या हालचाली संशयास्पद होत्या. पण, तो नजरचुकीने भारतीय हद्दीत घुसला असावा, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली असली तरी, याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. या संदर्भात आता प्रोटोकॉलनुसार कारवाई केली जाईल. त्यानंतर संबंधित सैनिकाल चिनी लष्कराच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. संबंधित सैनिकाकडे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचा सैनिक असल्याची आणि चिनी नागरिक असल्याची कागदपत्रे मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT