Vyankatraman sakal
देश

Mhapsa Crime : मुलगा वडिलांजवळ जाईल या भीतीने खून? व्यंकटरमण यांची उद्या डीएनए चाचणी

संशयित सूचना सेठ व तिचा पत्नी व्यकंटरमण यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायलयात गेले होते. दोघांच्या घटस्फोटासाठी बंगळूरमध्ये सुनावणी चालू होती.

सकाळ वृत्तसेवा

म्हापसा (गोवा) - संशयित सूचना सेठ व तिचा पत्नी व्यकंटरमण यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायलयात गेले होते. दोघांच्या घटस्फोटासाठी बंगळूरमध्ये सुनावणी चालू होती. याव्यतिरिक्त चिन्मयच्या कस्टडीसाठी दोघांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती.

अशातच, बंगळूरच्या कुटुंब न्यायालयाने व्यकंटरमण यांना चिन्मयला भेटण्यासाठी परवानगी दिली होती आणि कदाचित हाच मुद्दा सूचनाला खटकला असावा व तिने चिन्मयची हत्या केली असावी अशी शक्यता व्यकंटरमण यांच्या बाजूने वकील अ‍ॅड. अझर मीर यांनी शनिवारी माध्यमांसमोर व्यक्त केली.

अ‍ॅड. अझर मीर पुढे म्हणाले की, सूचना यांना राग होताच, तर तो त्यांनी व्यकंटारमण यांच्यावर काढायचा होता. चिन्मयचा जीव घेऊन कुणाचे बरे झाले! राहिला प्रश्न, न्यायाची तर आम्हाला कुठल्याच न्यायाची अपेक्षा नाही. कारण, चिन्मय या जगात नाही. चिन्मयसाठी व्यकंटरमण हे स्वतःचा जीव दिले असते. राहिला प्रश्न सूचना हिला शिक्षा होऊ अथवा नाही.

किंवा सूचना यांना पोलिस कोठडीतच ठेवल्याने सुद्धा व्यंकटरमण यांना आता कोणताच फरक पडत नाही. कारण, व्यकंटरमण यांनी त्यांचे सर्वस्व असलेला चिन्मय गमावला असल्याचा दावा अ‍ॅड. मिर यांनी केला.

व्यकंटरमण हे सूचना सेठ यांचा छळ करायचे अशा काही बातम्या समोर येताहेत, असे विचारले असता अ‍ॅड. अझर मिर म्हणाले की, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. तसेच, दोघांमध्ये नक्की काय चालले होते ते मला माहिती नाही. आणि असे काही असते तर सूचना यांनी चिन्मयला का ठार मारले? मुळात चिन्मय सूचना यांचा छळ करत होता का? राग काढायचा होता तर व्यकंटरमण यांच्यावर सूचना हिने काढायचा! त्या निष्पाप चिमुकल्याचा या साऱ्यात काय दोष होता, असे म्हणत अ‍ॅड. मीर यांनी व्यकंटरमण यांची बाजू मांडली.

मुळात चिन्मयचा खूनाचा आरोप असणारी व्यक्ती ही पोलिस कोठडीत आहे, तर दुसरी व्यक्ती (व्यकंटरमण) यांनी चिन्मयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

डीएनए चाचणी सोमवारी होणार

येत्या सोमवारी (ता. १५) कळंगुट पोलिस सूचना हिला बाल न्यायालयात पुढील रिमांडसाठी हजर करतील. सूचना हिचा पोलिस रिमांड रविवारी (ता. १४) संपतो. तसेच, कळंगुट पोलिस व्यकंटारमण यांना सोमवारी गोमेकॉत डीएनए चाचणीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT