Chinmayanand 
देश

भाजप खासदाराविरोधात पीडित विद्यार्थिनीने दिला पेन ड्राइव्ह 

वृत्तसंस्था

शाहजहानपूर : भाजपचे खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विशेष तपास पथकाला (एसआयटी) 43 व्हिडिओ असलेला एक पेन ड्राइव्ह सादर केला आहे. चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या आरोपांना बळ देणारी माहिती या व्हिडिओंमध्ये आहे, असा दावा संबंधित विद्यार्थिनीने केला आहे, असी माहिती सूत्रांनी दिली. 

माजी केंद्रीय मंत्री असलेल्या चिन्मयानंद यांच्या विरोधातील सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश एसआयटीने विद्यार्थिनीला दिले होते. शुक्रवारी एसआयटीकडून विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली होती. तसेच, चिन्मयानंद यांच्या शयनगृहातून पुरावेही गोळा करण्यात आले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीकडून विद्यार्थिनीला चिन्मयानंद यांच्या घरी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी सुमारे पाच तास तपास करण्यात आला. शनिवारी विद्यार्थिनीच्या आईला एसआयटीकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

एसआयटीने गुरुवारी रात्री सलग सात तास चिन्मयानंद यांची चौकशी केली. तसचे, दिव्यधाम येथील त्यांच्या निवासस्थानातील शयनगृहही सील केले. चिन्मयानंद यांच्या ट्रस्टकडून अनेक महाविद्यालये चालविली जातात. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी विद्यार्थिनी याच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. 

व्हिडिओ दाखवून केले शोषण 
चिन्मयानंद यांच्या शयनगृहातून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले असून, त्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला. मात्र, मसाज करण्यासाठी वापरली जाणारी दोन भांडी एसआयटीने जप्त केली असल्याचे तिने सांगितले. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर चिन्मयानंद यांनी घरी बोलावले. त्या वेळी माझा अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ त्यांनी मला दाखविला आणि त्यानंतर आपल्या लैंगिक शोषणाला सुरवात झाली, असा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT