देश

ते प्री वेडिंग त्यांना आयुष्यभर राहिल लक्षात!

सकाळ डिजिटल टीम

चित्तोडगढ : चितोडगढमधील चंबळ नदीवर राणाप्रताप धरण परिसरातील धब्यधब्यावर चार जण अडकल्याची घटना घडली आहे. चुलिया येथील धबधब्याजवळ प्री वेडींग शुटसाठी आलेले नवरा नवरीसह आणखी दोघेजण येथे पाण्यात अडकले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी सर्वांची सुखरूप सुटका केली आहे.

कोटो येथून प्री-वेंडीगं शुटसाठी चौघेजण चुलिया धबधब्यावर आले होते. राणाप्रताप धरणाचे दरवाजे अचानक उघडल्यामुळे अचानक धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला. शुटिंगमध्ये व्यस्त असताना काही समजण्याच्या आत ते पाण्यामध्ये अडकले होते. तेथील एका मोठ्या खडकाचा त्यांना आधार मिळाला आणि त्याच्या चौफेर पाणी जमा झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अचानक धराणाचे दरवाजे उघडल्यामुळे वाढलेल्या प्रवाहाच्या पाण्यात प्री-वेडींगशुटसाठी आलेले नवरा नवरी, व्हिडिओग्राफर आणि एक महिला अडकले होते. सर्वांची सुखरूप सुटका झाली आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच रावतभट्ट पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनतर त्यांनी पाण्यामध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला पाचारण केले. दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना वाचविण्यात बचाव पथक आणि पोलिसांना यश आलेे.

दरम्यान, चौघांना वाचविल्यानंतर रावतभट्ट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 1 डिसेंबरला दोघांचे लग्न होणार आहे अशी माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT