Cigarette Smoking madhya pradesh news esakal
देश

धक्कादायक! मुलींमध्ये बिडी ओढण्याचं प्रमाण वाढलं; आकडेवारीने सरकारसुद्धा हादरलं

सकाळ डिजिटल टीम

Madhya Pradesh: मध्य प्रदेशात दारुबंदी आणि नशेखोरीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आवाज उठवलेला आहे. त्यातच आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये मुलींचं सिगारेट आणि बिडी ओढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. देशाच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी भूवया उंचावणारी आहे.

'ग्लोबल यूथ टोबॅको'ने केलेल्या सर्व्हेचे आकडे समोर आलेले आहेत. शनिवारी भोपाळमध्ये उमंग स्कूल हेल्थ अँड वेलनेस कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये आरोग्यमंत्री डॉ. प्रभूराम चौधरी उपस्थित होते. त्यांनीच या सर्व्हेच्या रिपोर्टचं विमोचन केलं. या कार्यक्रमाला नॅशनल हेल्थ मिशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर प्रियंका दास उपस्थित होत्या.

या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात सरासरी सात वर्षांच्या वयातच मुली सिगारेट ओढणं शिकतात. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण चिंताजनक आहे. २.१० टक्के मुली तर २.४० टक्के मुलं सिगरेट पितात. यामध्ये सगळ्यांचं वय १३ ते १५ वर्षे आहे.

देशामध्ये सरासरी ११.५ वर्षांची मुलं सिगारेट ओढतात. या तुलनेत मध्य प्रदेशची सरासरी ८.५ वर्षे इतकी आहे. फक्त मुलींचा विचार केल्यास देशात सरासरी ९.३ वर्षामध्ये मुली सिगारेट ओढायला सुरु करतात. तर मध्य प्रदेशात सात वर्षांपासूनच मुली बिडी आणि सिगारेट ओढण्यास सुरुवात करतात. मध्य प्रदेशसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT