Cipla launches Cipremis claims it is the cheapest Remdesivir
Cipla launches Cipremis claims it is the cheapest Remdesivir 
देश

खूशखबर ! सिप्लाने आणलंय कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध

वृत्तसंस्था

बंगळूरु : कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्याही वाढत आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून सिप्ला इंडिया या भारतीय कंपनीने कोरोनावर सर्वात स्वस्त औषध आणलं आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाची सिप्रेमी ही जेनेरिक आवृत्ती सिप्ला इंडिया या कंपनीने तयार केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सिप्ला इंडियाने तयार केलेल्या औषधाच्या १०० मिलिग्रॅमच्या कुपीची किंमत चार हजार रुपये (५३.३४ डॉलर) इतकी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना आजारावर जगभरात देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये सिप्रेमी हे सर्वात कमी किमतीचे औषध ठरले आहे. त्याद्वारे सिप्ला इंडियाने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवरही मात केली आहे.

सिप्रेमी औषधाची पहिली बॅच १० हजार कुप्यांची आहे. युरोपातील मायलॅन या कंपनीनेही रेमडिसिव्हिर औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली असून, त्यापेक्षा सिप्लाच्या सिप्रेमी औषधाची किंमत ८०० रुपयांनी कमी आहे. हितेरो लॅब्ज लिमिटेड या कंपनीने रेमडिसिव्हिरच्या बनविलेल्या जेनेरिक आवृत्तीची किंमत ५४००, तर मायलॅनने बनविलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ४,८०० रुपये इतकी आहे.

महिनाभरात या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येतील. आम्ही कोरोनावर तयार करत असलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ५ हजारांपेक्षा अधिक असणार नाही, असे सिप्ला इंडियाने याआधीच जाहीर केले होते. सिप्लासाठी हे जेनेरिक औषध बनविणारे व पॅकेजिंग करणाऱ्या सॉव्हरिन फार्मा या कंपनीने सिप्रेमी औषधाची पहिली बॅच उत्पादित करून रवाना केली आहे. हे औषध सध्या सरकारमार्फत तसेच रुग्णालयांतूनच उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT