kanimozi 
देश

'हिंदी येत नाही म्हटल्यावर विचारलं तुम्ही भारतीय आहात का?'

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई -  मला हिंदी येत नाही असे म्हटल्यानंतर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्याने मला, ‘तुम्ही भारतीय आहात का?’ असा प्रश्‍न विचारला, असा आरोप द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी यांनी आज केला. दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. 

‘भारतीय म्हणजे हिंदी असे समीकरण कधीपासून झाले आहे, याची मला माहिती हवी आहे,’’ असे कनिमोळी यांनी hindiimposition या हॅशटॅगद्वारे ट्विट केले आहे. या घटनेनंतर ‘सीआयएसएफ’ने ट्विट करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. कनिमोळी यांनी म्हटलं की, दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर पोहचल्यावर चौकशी केली जात होती. तेव्हा मी जे विचारायचे ते तामिळ किंवा इंग्रजीतून विचारा मला हिंदी येत नाही असं म्हटलं तर अधिकाऱ्याने थेट तुम्ही भारतीय आहात का असा प्रश्न विचारला. 

आपल्याला एखादी भाषा बोलता येत नसणं किंवा एखाद्या धर्माचे नसल्यानं आपल्या भारताच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित कसा केला जाऊ शकतो. भाषा येत नसेल किंवा विशिष्ट धर्माचे नसेल तर भारतीयत्व कमी होत नाही. देशाचं मोठेपण हे विविधतेमध्ये आणि सर्वसमावेशकतेत आहे. आपण नेमकी हीच गोष्ट विसरत चाललो आहोत अशा भावना कनिमोळी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

कनिमोळी यांच्याबाबतीत असा प्रकार घडल्यानंतर सीआयएसएफनं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीआयएसएफने ट्विट करून म्हटलं की, एखादी भाषा बोलण्यासाठी किंवा व्यवहारासाठी वापरली जावी यासाठी आग्रह करणं हे सीआयएसएफच्या धोरणात नाही. दरम्यान, विमानतळावर घडलेल्या प्रकारानंतर सीआयएसएफनं घेतलेल्या चौकशीच्या निर्णयाबद्दल कनिमोळी यांनी आभारही मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT