Civil Aviation Ministry issued notices IndiGo and the Mumbai airport 
देश

IndiGo Mumbai airport: रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा

Civil Aviation Ministry issued notices IndiGo and the Mumbai airport: मुंबई विमानतळावर काही प्रवासी रनवेवर बसूनच जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मुंबई विमानतळावर काही प्रवासी रनवेवर बसूनच जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने इंडिगो आणि मुंबई एअरपोर्टला नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांना यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(Civil Aviation Ministry issued notices IndiGo and the Mumbai airport after a video of passengers sittinge runway eating food)

निर्धारित वेळेमध्ये माहिती दिली गेली नाही. तर कडक कारवाई करण्यात येईल. यात आर्थिक दंडाचा देखील समावेश असेल, असा सक्त इशारा मंत्रालयाने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज सकाळी यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रवाशांची योग्य काळजी न घेतल्याप्रकरणी मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयाने मुंबई विमानतळ प्रशासन आणि इंडिगो कंपनी या दोघांना या घटनेसाठी जबाबदार धरलंय. परिस्थितीबाबत योग्य अंदाज न बांधणं आणि प्रवाशांना योग्य सुविधा न पुरवणं या गोष्टींसाठी दोघेही कारणीभूत असल्याचं मंत्रालयाकडून म्हणण्यात आलंय.

मुंबई विमानतळाने प्रवाशांना रेस्टरुम आणि रिफ्रेशमेंट सुविधेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांना रणवेवरच थांबावं लागलं. यावेळी सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असं मंत्रालयाने म्हटलंय. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात प्रवासी रनवेवर बसले होते आणि याच ठिकाणी ते जेवण करत होते. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरुन याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

इंडिगोने व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. फ्लाईट 6E2195 गोवा ते दिल्ली जाणार होते. दिल्लीतील धुक्यांमुळे फ्लाईट मुंबईकडे वळवण्यात आली. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची माफी मागतो. या प्रकरणात आम्ही लक्ष घालत आहोत, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT