One Rank one pension Case News 
देश

OROP arrears case: 'वन रँक, वन पेन्शन'प्रकरणी SCचा केंद्राला झटका! म्हणाले, गुप्तता कशासाठी?

'वन रँक, वन पेन्शन' अंतर्गत थकबाकी नक्की किती आहे? याची माहिती कोर्टानं मागितली होती.

सकाळ डिजिटल टीम

OROP arrears case: 'वन रँक, वन पेन्शन' (OROP) प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला झटका दिला आहे. याप्रकरणी केंद्रानं कोर्टासमोर सादर केलेल्या बंद लिफाफ्यातील अहवाल स्विकारण्यास सरन्यायाधिशांनी नकार दिला आहे. यामध्ये गुप्त असं काय आहे? असा सवालही सुप्रिम कोर्टानं केंद्राला विचारला आहे.

सैन्यातील 'वन रँक, वन पेन्शन' थकबाकी प्रकरणी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टा २० मार्च रोजी बंद लिफाफ्यातून अहवाल पाठवला. पण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी हा बंद लिफाफ्यातील अहवाल स्विकारण्यास नकार दिला.

याप्रकरणी सरन्यायाधीश म्हणाले, "मला वैयक्तिकरित्या अशा प्रकारे बंद लिफाफ्यातून अहवाल सादर करणं आवडत नाही. कोर्टात पारदर्शका असायला हवी, या सर्व गोष्टी आदेशाचं पालन करण्यासंदर्भात आहेत. त्यामुळं यामध्ये गुप्त ठेवण्यासारखं असं काय आहे? असा सवालही सरन्यायाधीशांना केंद्राला केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे बंद लिफाफ्यातून माहिती सादर करणं कोर्टातून हद्दपार करायला हवं अशी टिप्पणीही यावेळी सरन्यायाधीशांनी केली.

हे मूलभूत न्याय प्रक्रियेच्या विरुद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सुप्रीम कोर्टात सध्या भारतीय माजी सैनिक चळवळीच्या (IESM) जनहित याचिकेवर सुनावणी करत आहे. 'वन रँक, वन पेन्शन' प्रकरणी थकबाकी मिळवण्यासंदर्भात ही याचिका आहे.

हे ही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सुप्रीम कोर्टानं नुकतेच यासंदर्भात संरक्षण खात्याला आदेश दिले होते की, "'वन रँक, वन पेन्शन' अंतर्गतची थकबाकी नक्की किती आहे? याची माहिती तीन पानी पत्राद्वारे सादर करावी. या पेन्शनची वाट पाहत असलेल्या ४ लाख निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा देखील कोर्टानं उपस्थित केला होता.

यानंतर तीन सदस्यीय खंडपीठानं केंद्राला आदेश दिले होते की, पेन्शनच्या पद्धती कुठल्या आहेत त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच पेन्शनची ही थकबाकी देताना त्यात प्राधान्यक्रम असावा यामध्ये पहिल्यांदा शहीदपत्नी आणि जुन्या निवृत्तीधारकांचा क्रमांक असावा, असंही कोर्टानं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT