देश

CJI Chandrachud : चंद्रचूड यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; न्यायिक प्रक्रियेत केल्या 'या' सुधारणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पदभार घेतल्यापासून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी देशातील न्यायालयाशी संबंधित समस्यांबाबत माहिती दिली. चुटकीसरशी सगळे प्रॉब्लेम्स सोडवायला मी जादूगार नाहीये, असं ते म्हणाले.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीजेआय चंद्रचूड म्हणाले की, ज्या दिवशी मी शपथ घेतली होती त्या दिवशी मी न्यायालयाचे सदस्य, बार आणि सर्वांना सांगितलं की, एका झटक्यात समस्या सोडवण्यासाठी मी जादूगार नाही. तरीही न्यायालयांवर परिणाम करणाऱ्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची तयारी मी दाखवली.

ते पुढे म्हणाले की, मी सगळ्यात अगोदर माझ्या खंडपीठातील माझ्या सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला. त्यासाठी न्यायिक प्रक्रियेतील अधिकारी, अभ्यासक आणि संशोधकांची एक टीम तयार केली. त्यामुळे काहीअंशी काम उभं करता आलं.

''न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि खटले वेगाने निकाली लावणं आवश्यक आहे. मागील वर्षभरामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालीकेतील कामकाजामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. न्यायिक पक्षाबद्दल सांगायचं झालं तर, वर्षभरात साधारण ५० हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. हा आकडा त्याच कालावधीमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांइतका आहे.''

चंद्रचूड पुढे म्हणाले की, सोशल मीडियाने न्यायपालीकेच्या कामाजावर लक्ष केंद्रीत केलं आहे. कोर्टात सुरु असलेल्या कार्यवाहीचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय होतं आणि न्यायाधीश नेमकं काय करतात; याचा परिणाम दिसून लागला आहे. न्यायाधीशांनी केलेली विधानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT