देश

सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार मराठी माणसाला?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.

बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. बोबडे हे 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून प्रॅक्टिस केली. काही वर्षांच्या प्रक्टिसनंतर 1998 मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. त्यानंतर मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्तीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. 

2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

23 एप्रिलला निवृत्ती

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे गेली अनेक वर्षे विधी क्षेत्रात आहेत. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी झाली तर ते सरन्यायाधीश म्हणून सुमारे 523 दिवस असणार आहेत. 

बोबडे दुसरे न्यायाधीश

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : सीएसएमटी स्थानकातील वायफायवर सायबर हल्ला

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT